Shevgaon : भाजप शनिवारी व्हर्च्यूअल रॅली; माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार सुभाष भामरे करणार संबोधित 

0
प्रतिनिधी| राष्ट्र सह्याद्री 
शेवगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी 2.0 सरकारचे प्रथम वर्ष यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून शेवगाव तालुक्यातील जनतेसाठी शनिवारी (दि.20)  सायं.5:30 वाजता व्हर्च्युअल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीस माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ सुभाष भामरे संबोधित करणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे तालुका संयोजक अनिल वडागळे यांनी दिली.

या ‘व्हर्चुअल रॅली’ जनसंवाद मेळाव्यात समाविष्ट होणेसाठी Google play store वर जाऊन “Cisco Webex meeting” हे ॲप मेळावा (डाऊनलोड करा)  सुरू होण्या अगोदर डाऊनलोड करावे, जेणेकरून या मेळाव्याच्या वेळी आपल्याला मीटिंग नंबर टाकून मेळाव्यात समावेश घेता येईल.

मिटिंग नंबर- 1562298955 शेवगाव तालुक्यातील सर्व बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, सोशल मीडिया पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी,शेवगाव तालुक्यातील सर्व जनतेनी या व्हर्च्युअल रॅली मध्ये सहभागी व्हावे, असे भाजपचे तालुका संयोजक सोशल मीडिया प्रमुख अनिल वडागळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here