प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर – चीनच्या सैन्याने लडाखमध्ये भारतीय जवानांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा बेलापूरच्या ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी सकाळी झेंडा चौकात चीनचा प्रतिकात्मक पुतळा दहन करत तसेच चिनी वस्तूंची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.
चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बेलापूर शहरात चौकात चीनच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी माजी सरंपच भरत साळुंके उपसंरपच रवींद्र खटोड महेश व्यास अभिजीत रांका प्रशांत बिहाणी सागर ढवळे विक्रम महाले भुषण चंगेडिया रमाकांत खटोड आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.