Techno Updates : …हे 50 चायनीज अॅप्स आहेत देशासाठी घातक

1

टिक-टॉकपासून ते ब्यूटी प्लस आणि क्लब फैक्ट्री या शॉपिंग अॅपचाही समावेश

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

भारतीय सुरक्षा एजन्सींनी टिक-टॉकपासून ते ब्यूटी प्लस आणि क्लब फैक्ट्री पासून ते शेन या शॉपिंग अॅप पर्यंत अशा 50 अॅप्सची यादी जाहीर केली आहे. सुरक्षा एजन्सीच्या दाव्यानुसार हे चीनी अॅप्स देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहेत. 

चीन ने गालवान घाटीवर केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशवासियांमध्ये चीन विरोधी वातावरण मोठ्या प्रमाणात तापत आहे. अनेक ठिकाणी चिनी वस्तूंची होळी करण्यात येत आहे. चीनचा अॅपच्या माध्यमातून भारतातून अरबो डॉलरचा व्यवसाय आहे. शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्यापासून अनेकांनी रिमुव्ह चायना अॅप ही मोहीम चालविली आहे. त्यात सुरक्षा एजन्सीने ही यादी जाहीर करून देशवासियांना हे अॅप रिमुव्ह करण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षा एजन्सीजच्या दाव्यानुसार देशवासियांचा महत्वपूर्ण डाटा भारताबाहेर जात आहे. कारण हे सर्व अॅप्स आपल्या युझरचा डाटा आपल्याजवळ ठेवते. चीनच्या प्रत्येक कंपनीला त्यांच्याजवळचा डाटा त्यांच्या सरकारसोबत शेअर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हे चायनीज अॅप देशासाठी घातक आहेत.

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, भारत सरकार काही अॅप्सवर बंधन आणण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत बोलणी सुरू आहे. मात्र, सरकारने हे वृत्त फेटाळले आहे.

हे आहेत ते 50 चाइनीज अॅप्स

टिक-टॉक (TikTok)
हेलो (Helo)
यूसी ब्राउजर (UC Browser)
यूसी न्यूज (UC News)
शेयर इट (Sharit)
लाइकी (Likee)
360 सिक्योरिटी (360 Security)
न्यूज डॉग (NewsDog)
शिन (SHEIN)
विगो वीडियो (Vigo Video)
वी चैट (WeChat)
वीबो (Weibo)
जूम (ZOOM)
वीबो लाइव (Vibo live)
क्लब फैक्टरी (Club Factory)
शेंडर  (Xender)
ब्यूटी प्लस (BeautyPlus)
क्वाई (Kwai)
रोमवी (ROMWE)
फोटो वंडर (Photo Wonder)
एपीयूएस ब्राउजर (APUS Browser)
वीवा वीडियो (VivaVideo)
क्यूयू वीडियो इंक (QU Video Inc)
परफेक्ट कोर्प (Perfect Corp)
सीएम ब्राउजर (CM Browser)
वायरस क्लीनर (Virus Cleaner)
हाई सिक्योरिटी लैब (Hi Security Lab)
एमआई कम्यूनिटी (Mi Community)
डीयू रिकाॅर्डर (DU recorder)
यूकैम मेकअप (YouCam Makeup)
एमआई स्टोर (Mi Store)
डीयू बैटरी सेवर (DU Battery Saver)
डीयू ब्राउजर (DU Browser)
डीयू क्लीनर (DU Cleaner)
डीयू प्राइवेसी (DU Privacy)
क्लीन मास्टर (Clean Master)
बैदू ट्रांसलेट (Baidu Translate)
बैदू मैप वंडर कैमरा (Baidu Map Wonder Camera)
ईएस फाइल एक्पलोरर (ES File Explorer)
क्यूक्यू इंटरनेशनल (QQ International)
क्यूक्यू लाॅन्चर (QQ Launcher)
क्यूक्यू सिक्योरिटी सेंटर (QQ Security Centre)
क्यूक्यू प्लेयर (QQ Player)
क्यूक्यू म्यूजिक-क्यूक्यू मेल (QQ Music QQ Mail)
क्यूक्यू न्यूज फीड (QQ NewsFeed)
वी सिंक (WeSync)
सेल्फी सिटी (SelfieCity)
क्लैश ऑफ किंग्स मेल मास्टर (Clash of Kings Mail Master)
एमआई वीडियो काॅल-शाओमी (Mi Video call-Xiaomi)
पैरेलल स्पेस (Parallel Space)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here