Newasa : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनी अमावस्येची यात्रा रद्द

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई – गेल्या तीन महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असून जवळपास बहुतेक गर्दीचे ठिकाण बंद करण्यात आले आहेत. त्यात धार्मिक स्थळ देखील असून यात्रा भागवत सप्ताह रामायण जागरण गोंधळ यावर बंदी घालण्यात आली. चालू वर्षातील पहिलीच शनी अमावास्या आहे पण मंदिर प्रशासनाने यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाची परवानगी घेऊन फक्त पासधारकांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी बारा वाजता होणारी पूजा – अभिषेक हे करता आले असते परंतु मागील महिन्यात शनी जयंतीनिमित्त मंदिरात कुणीही जाऊ नये, असे शासनाचे आदेश असताना देखील बरीच ऊत्साही भक्त मंडळी दुपारच्या आरतीला हजर होती.

घटनेवरून बराच वाद झाला होता. त्यात काही विश्वस्तांनी देखील जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज शनी अमावस्या असून देखील फक्त दैनंदिन आरती होणार आहे, अशी माहिती मिळाली असून मंदिर प्रशासन कोणतीही जोखीम
घ्यायला तयार नाही. शनी अमावास्या रद्द झाल्यामुळे व्यावसायिक मात्र हवालदिल झाले असून या दिवशी लाखो रुपयांची ऊलाढाल होते. ती न झाल्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here