प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे बेळे यांच्या बंद असलेल्या घरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या व छताला टांगलेल्या अवस्थेत आढळून आले.

प्रत्यक्ष दर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा. वांगी बुद्रुक हे गाव छोटे असून मृत व्यक्ती गावातील नाही. मात्र, त्याची ओळखही पटू शकली नाही. सकाळी गावातीलच काही नागरिकांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. दुपारनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मात्र, मृतदेह खाली घेण्याच्या परिस्थितीत किंवा हलविण्याच्या स्थितीत नसल्यामुळे जागेवरच शवविच्छेदन व पंचनामा करण्याचे ठरले. दरम्यान, तो मृतदेह कोणाचा असावा गावात कसा आला? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.