Shrigonda : बळीराजाच्या अडचणीत वाढ; पाऊस झाला, पेरण्या केल्या मात्र बियाणे उगवलेच नाही!

0

बियाणे न उगवल्यास कृषी कार्यालयात तक्रार द्या – कृषी अधिकारी म्हस्के

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील काही भाग वगळता खरीप हंगामात पेरणी एवढा पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, सोयाबीन असे कमी अधिक पावसावर येणारे धान्य पेरणी केली आहे. जेवढा पाऊस पडला त्यावर ही पिकांची उगवण होत असते, असा शेतकऱ्यांचा पूर्वापार अनुभव असल्याने मागील आठ पंधरा दिवसात जसा वापसा होईल तशा पेरण्या केल्या. मात्र काही ठिकाणी बाजरी, तूर उगवली नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

तालुक्यातील सहा कृषी मंडळाच्या पैकी तीन ते चार कृषी मंडळात येणाऱ्या गावातून पेरलेले बियाणे उगवले नसल्याची तक्रार तालुका कृषी विभागाकडे आल्या आहेत. याबाबत तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या शेताची पाहणी करण्यात येणार आहे. पेरणी केली मात्र बियाणे उगवले नाही अशा शेतकऱ्यांनी आपली तक्रार तालुका कृषी कार्यालयात नोंदवावी. त्याचे पंचनामे करून अहवाल तयार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here