Border : पाकिस्तानच्या अचानक हल्ल्याचा धोका – कर्नल (नि) अनिल आठल्ये

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

भारतात एखादी घटना घडली, साधा अपघात झाला, तरी पाकिस्तानी राजकारणी आणि तेथील सैन्य दलाला आनंदाच्या उकळ्या फुटतात; परंतु भारत-चीनमध्ये लडाख सीमेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पेचप्रसंग असताना पाकिस्तानी माध्यमं आणि तेथील राजकारणी गप्प आहेत. त्यांनी गुपचिळी स्वीकारली आहे, हे आश्चर्चयकारक आहे. त्यामुळं असा दाट संशय आहे, की पाकिस्तान भारताविरुद्ध अचानक कारवाईचा विचार करीत असावा. लष्करीदृष्ट्या पर्वतीय भागात लढण्यासाठी उपयुक्त शस्त्रास्त्रे आणि हेलिकाॅप्टर चीनच्या सरहद्दीवर नेण्यात आली आहेत. भारताच्या या परिस्थितीचा फायदा पाकिस्तान उठवण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या पर्वतीय भागात पाकिस्ताननं आगळीक केल्यास त्याला उत्तर देणं आपल्यादृष्टीनं तेवढं सोपं नाही.

भारताची बरीचशी हवाई शक्ती चिनी सीमेवर गुंतली आहे. असं असलं, तरी पाकिस्तानच्या विरोधात मैदानी भागात आपल्याला लष्करी कारवाई करता येईल. काश्मीरमध्ये पाकिस्तान काही करायला गेला, तर पंजाबमध्ये कारवाई करणं हे भारताचं त्यावरचं उत्तर असू शकतं. १९६५ च्या युद्धात हे आपण केलं होतं; परंतु पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर हल्ला केल्यास या चकमकीचे रुपांतर अणुयुद्धात होण्याची भीती आहे.

पाकिस्तान त्याचा पुरेपूर फायदा उठविण्याची शक्यता आहे. चीनची लडाखमधील कारवाई ही केवळ पाकिस्तानला मदत करण्यासाठी केलेला प्रयत्न असू शकतो. अर्थात आपले नाैदल पाकिस्तानपेक्षा कितीतरी वरचढ आहे. त्यामुळं पाकिस्तानविरुद्ध नाैदलाचा वापर करण्याचा पर्याय आपल्याला खुला आहे. अनेकांना माहीत नसेल, की कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय नाैदलानं पाकिस्तानच्या किनारपट्टीवर हल्ल्याचा इशारा दिला होता.

चीन आणि पाकिस्तान अशा दोन आघाड्यांवर आपल्याला लढण्याचं शिवधनुष्य आपल्याला पेलावं लागेल. त्यासाठी सामान्य नागरिकांची मानसिकता आपल्याला तयार करावी लागेल. पाकिस्तानच्या अचानक हल्ल्याचा धोका लक्षात घ्यायला हवा.

(शब्दांकनः भागा वरखडे)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here