प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कडा – प्रवाशांना सुरक्षित सेवा देणा-या परिवहन महामंडळाच्या एसटीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या मालवाहतूक सेवेचा कड्यात एसटीच्या अधिका-यांच्या उपस्थितीत नुकताच शुभारंभ करण्यात आला.
राज्य शासनाकडून परिवहन महामंडळाच्या एसटीला खाजगी क्षेत्रात मालवाहतूक करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे एसटी महामंडळाने उपलब्ध करुन दिलेल्या सुरक्षित मालवाहतूक सेवेचा कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रविवारी एसटीच्या अधिका-यांसह व्यापा-यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी एसटीचे सहाय्यक वाहतूक निरिक्षक बबन गायकवाड, वाहतूक नियंत्रक रमेश भोजने, माजी वाहतूक नियंत्रक हनुमान परदेशी यांच्यासह संजय मेहेर, योगेश भंडारी, दिलीप बलदोटा, नितीन चानोदीया, संजय पितळे, शैलेश गांधी, विनोद पोखरणा आदी व्यापारी उपस्थित होते. या उपक्रमाचे आष्टीचे आगार व्यवस्थापक संतोष डोके यांनी स्वागत केले आहे.