प्रतिनिधी राष्ट्र सह्याद्री
शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासन निर्णयानुसार तत्कालीन तहसीलदार अशिमा मित्तल यांनी शासन निर्णय प्रमाणे 90 दिव्यांगाना पिवळी शिधापत्रिका देण्यासाठी व अंत्योदय योजनेत समावेश करण्यासाठी मंजुरी दिली. त्यानुसार पुरवठा विभाग शेवगाव यांच्याकडून दिव्यांग बांधवांच्या शिधापत्रिका तयार करण्यात आल्या त्यानंतर दि.19 मार्च 2020 रोजी प्राथमिक स्वरूपात एक शिधापत्रिकाचे तत्कालीन तहसीलदार यांनी वितरण केले. उर्वरित शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या नाही. तयार शिधापत्रिका वाटप करत नाहीत म्हणजे दिव्यांग बांधवाकडून पुरवठा विभागाला काही चिरीमिरीची अपेक्षा आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लवकरत क्षैक्षणिक वर्ष सुरू होत आहे त्यासाठी उत्पन्न दाखले काढणे आवश्यक आहे. तसेच दवाखान्यासाठी देखील उपचार घेण्यासाठी शिधापत्रिकेची अत्यंत आवश्यकता आहे. यामुळे दिव्यांग बांधव अडचणीत सापडला आहे व तालुक्यातील दिव्यांग बांधवांची तहसील कार्यालयाविरूद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याचा निषेध म्हणून आज सोमवारी (दि.22) तहसील कार्यालयासमोर उपोषणाचे पत्र दिले होते. त्यानुसार सावली दिव्यांग संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष चाँद शेख, उपाध्यक्ष संभाजी गुठे सचिव नवनाथ औटी शहर अध्यक्ष गणेश महाजन, उपाध्यक्ष सुनील वाळके,
यांनी शेवगाव तहसीलदार माननीय अर्चना भाकड(पागिरे)मॅडम यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदार यांनी 15 दिवसांत योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. चर्चे दरम्यान पोलीस स्टेशन शेवगावमधील चव्हाण साहेब यांनी मध्यस्थी करून चर्चेच्या मार्गाने तोडगा काढला.
मुख्यमंत्री कार्यालयातून दिव्यांग बांधवांची दखल घेतली जाते. परंतु शेवगाव तहसील कार्यालय शेवगाव मधून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही याची खंत वाटते. तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांना कार्यालयात येण्या जाण्यासाठी व्हिलचेअर देखील नाही. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो. पंधरा दिवसांत दिव्यांग बांधवांच्या तयार शिधापत्रिका वाटप करून दिव्यांगाच्या अडचणी सोडण्यात आल्या नाही तर सावली दिव्यांग संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे तीव्र आंदोलन केले जाईल अशी माहिती चाँद शेख यांनी दिली. यावेळी नवनाथ औटी,सुनील वाळके,गणेश महाजन,मनोहर मराठे,राजेंद्र क्षीरसागर अनिल विंघ्ने,संभाजी गुठे उपस्थित होते.
finasteride prostate cancer – http://finasteridepls.com/ finasteride dosage
tadalafil cost – tadalafil 5mg buy tadalafil generic