Shrigonda : ढोकराई फाट्यावरील जुगार अड्ड्यावर छापा, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – पोलिसांनी काल (दि२०) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ढोकराई फाट्यावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकत ३२, ८६०रु रोख रक्कम, ५मोबाईल, २ दुचाकी तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ४७ हजार ८६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाईत जुगार खेळणा-या शशिकांत काशिनाथ ससाणे (वय 37 वर्षे) 2) सागर अरुण शिंदे (वय 33 दोघे, रा. श्रीगोंदा कारखाना) 3) दादा बाबुराव सुपेकर (वय 45)  4) बाळासाहेब छबु (दोघे राहणार ढोकराई फाटा) 5) नवनाथ तात्याबा राहींज 6) मयुर मारुती शिंदे राहणार निमगाव खलू यांच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना शनिवारी ढोकराई फाटा येथे एका घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जाधव यांनी पोलीस पथक सदर ठिकाणी पाठवून या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here