Shevgaon : निसर्गाचा -हास रोखण्यासाठी वृक्षसंवर्धन भविष्याची गरज – सुनिल गिरी महाराज

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ढोरजळगांव – जल है तो कल है पाणी टिकेल तर सजीव सृष्टी आहे. त्यासाठी वृक्ष ही मोठी संपत्ती असून तिचे जतन करायला शिका वृक्ष आसतील तर पाऊसही वेळेवर पडतो. निसर्गात अमुलाग्र बदल घडवून आणण्याची ताकद निसर्गात असून तिचा होणारा -हास रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन ही भविष्यातील काळाची गरज असल्याचे मत महंत सुनिल गिरी महाराज यांनी बोलतांना व्यक्त केले. 

भातकुडगांव तालुका शेवगांव येथे नुकतेच ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम महंत सुनिल गिरी महाराज व शेवगांव पंचायत समिती सभापती क्षितीज घुले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गिरी महाराज बोलत होते. यावेळी भातकुडगांवचे सरपंच राजेश फंटागरे,  प्रहारचे तालुकाध्यक्ष  संदीप बामदळे, आशोक देवढे खविसचे संचालक बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

गिरी महाराज पुढे म्हणाले की कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने खबरदारी घेऊन दैनंदिन वाटचाल करावी. भक्ती उपासना अंगीकार करून जगातील मोठ्या संकटाला मात देण्याची ताकद प्रत्येकाने स्व:तामध्ये निर्माण करावी, असे महंत गिरी महाराज यांनी बोलताना सांगितले.
यावेळी उपसरंपच सुनिल भवार, सचिन फटांगरे, रामभाऊ आडसरे, भास्कर शिंदे, ग्रामसेवक पाठक भाऊसाहेब, अर्जुन जाधव, मुकुंद जमधडे, पाराजी नजन, एकनाथ जमधडे, सखाराम लव्हाळे, आदींनी विशेष परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here