प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
थकीत कर्जामुळे जिल्हा सहकारी बँकेने कारवाईचा इशारा दिलेला राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी व जिल्हा सहकारी बँकेमार्फत मदत करावी व शेतकऱ्यांची व कामगारांची कामधेनू वाचवावी मागणीसाठी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व तालुक्यातील पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे नेते यांनी आज गुरुवारी (दि २५) माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची बु-हानगर येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली व कारखाना चालू करण्यासंदर्भात विनंती केली.
यावेळी डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हा. चेअरमन शामराव निमसे, संचालक सुरसिंगराव पवार, विजय डौले, के.मा. पाटील कोळसे, रवींद्र म्हसे, उत्तमराव आढाव, दत्तात्रय ढुस, अर्जुनराव बाचकर, गणेश चौधरी, नंदु डोळस, महेश पा. शिरसाठ, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे आदी उपस्थित होते.
tadalafil generic – tadalafil buy online tadalafil 40 mg