स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिसांची कामगिरी
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २५

OnePlus Nord 5G (Gray Onyx, 8GB RAM, 128GB Storage)
(as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)Redmi 9A (Nature Green, 3GB Ram, 32GB Storage)
₹ 7,499.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)कर्जत : तालुक्यातील मिरजगाव येथील शिंगवी कॉलनी येथे वकिलाच्या घरावर दरोडा टाकून तीन लाखांचा ऐवज चोरून दरोडेखोरांनी पोबारा केला होता. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
युवराज ऊर्फ धोंडीराम ईश्वर भोसले वय २३,सोन्या ऊर्फ लाल्या ईश्वर भोसले वय २५दोघे रा.बेलगांव ता.कर्जत,देवीदास ऊर्फ देवड्या अभिमान काळे वय २८रा.हरीनारायण आष्टा ता.आष्टी जि.बीड यांना अटक केली.
मंगळवारी (दि.23) रात्री दोनच्या सुमारास सहा ते सात दरोडेखोरांनी मिरजगाव येथील शिंगवी कॉलनी येथील मधुकर विठ्ठल कोरडे यांच्या बंगल्याच्या स्वयंपाक घरातील दरवाजाचा कड़ी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला होता. यावेळी दरोडेखोर यांनी बेडरूममध्ये प्रवेश करुन कपाटाची उचकापाचक करुन सोन्या चांदीचे दागिन्या सह सुमारे तीन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कर्जत पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळपासून अनेक संशयितांची धरपकड़ सुरु करुन कसून चौकशी केली. पोलिस नाईक सुनील चव्हाण यांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन अटक आरोपींना पोलिस पथकासह जाऊन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा साथीदारांमार्फत केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच वरील तिघा आरोपींविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली कर्जतचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड़,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे,पोहेकॉ.दत्ता हिंगडे,अंकुश ढवळे,पोना.सुनील चव्हाण,अण्णा पवार,दिनेश मोरे,संतोष लोंढे,रविंद्र घुंगासे,संदीप पवार आदींनी कारवाईत भाग घेतला.