Ahmednagar : सीना नदीला पूर!

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नगर : शहरासह ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अहमदनगर शहरातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे नदीवरील छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. एक प्रकारे नदीला पूर आला आहे, अशी प्रतिक्रिया नदी लगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सीना नदी दुथडी भरून वाहू लागल्याने, वाहते पाणी पाहण्यासाठी नगरकरांनी नदी किनारी गर्दी केली होती. 

दरम्यान, मुंबई हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आजही मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अहमदनगर, पुणे आणि नाशिक येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नदी लगत असलेल्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here