Beed : परराज्यातील कामगारांना परत जायचे असल्यास या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी

0

संकेतस्थळावर अडचणी येत असल्यास 02442222653 आणि ई-मेल आयडी glolabourbeed@gmail.com वर संपर्क साधावा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

बीड – रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने 
 https//migrant.mahabocw.in/migrant/form हे संकेतस्थळ तयार केले असून बीड जिल्ह्यात असलेल्या परराज्यातील कामगारांना आपापल्या राज्यात परत जाण्याची इच्छा असेल त्यांनी या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी.
कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी 16 जून 2020 रोजी आदेश पारित केले असून त्यानुसार देशाच्या विविध राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या कामगारांना मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कामगार अधिकाऱ्यांची यासंदर्भात  नियुक्ती केली आहे.

बीड जिल्ह्यातील परराज्यातील कामगारांनी काही अडचणी संदर्भात सरकारी कामगार अधिकारी कार्यालय,आदर्श नगर डीपी रोड, बीड दूरध्वनी क्रमांक 02442222653 आणि ई-मेल आयडी glolabourbeed@gmail.com यावर संपर्क साधावा असे आवाहन सरकारी कामगार कल्याण अधिकारी एस.पी. राजपूत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here