Newasa : मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलन

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा फाटा – मोदी सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून शुक्रवार दि. २६ जूनला ‘शहिदों को सलाम दिवस’ या कार्यक्रमांतर्गत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेस काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विनम्र अभिवादन केले.
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची बैठक शुक्रवारी संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत असे पोहोच करण्यात येईल याबाबत सूचना करण्यात आल्या. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समन्वयक शिवाजी जगताप हे होते. तर प्रदेश समन्वयक बंटी यादव, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, अहमदनगर शहराध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष तोरणे, नेवासा तालुकाध्यक्ष नंदू कांबळे, काँग्रेस कमिटीचे नेवासा तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, मनोज बिडवे, सचिन साळवे, बबलू साळवे, पगारे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी केले.
यावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी तसेच मागासवर्गीयांवरील हल्ले थांबले पाहिजे, आदी मुद्द्यावर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले. नेवासा तालुकाध्यक्ष नंदू कांबळे यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here