प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील तरुण शेतकरी प्रमोद रामदास शिंदे (वय – ४५) याचा शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रमोद शिदें हे सकाळी कृषी पंप सुरू करण्यासाठी शेतातील विहिरीवर गेले होते. यावेळी त्याना विजेचा जोरदार धक्का बसला. बराचं वेळ होऊनही शिदें घरी न आल्याने कुटुंबातील व्यक्तीनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता प्रमोदला विजेचा धक्का बसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रमोदला लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतू उपचारापूर्वीचं त्याचे निधन झाले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी शोकाकूल वातावरणात प्रमोदवर अत्यंसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, प्रमोद शिदें यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई असा परीवार असून तो घरातील एकुलता एक कर्ता पुरुष असल्याने त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे आश्वीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.