Shevgaon : स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी प्रशांत घुमरे

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

लाडजळगाव येथील तरुण तडफदार व युवक कार्यकर्ते प्रशांत बप्पासाहेब घुमरे यांची स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले. 

यावेळी बाळासाहेब फटांगडे, अशोक भोसले ,पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट ,प्रवीण म्हस्के, अमोल देवढे  आदींसह बहुतांशी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने शेवगाव तालुक्यात नुकताच कोविड योद्ध्यांच्या सन्मानार्थ सन्मानपत्र वितरणाचा कार्यक्रम झाला. सध्या जगभरात थैमान घातलेल्या covid-19 या साथीच्या आजाराने संपूर्ण जग त्रस्त असताना शेवगाव तालुक्यातील अनेक मान्यवरांनी तालुक्यातील जनतेला मदतीचा हात देऊन आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने मदत केली. याच भावनेतून या जनसेवकांचा कुठेतरी सन्मान व्हावा त्यांना काम करण्यास नवी उभारी मिळावी या हेतूने शेवगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्ष यांच्या वतीने या समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम करण्याची पद्धत पाहून तालुक्यातील अनेक युवकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनामध्ये प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here