Shrigonda : देऊळगाव येथे मोराची हत्या, वनक्षेत्रपालाचा माहिती लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न

0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील देऊळगाव या ठिकाणी देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर या पक्षाची काही नागरिकांनी हत्या केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी वनविभाच्या अधिका-यांनी काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मोर हत्याकांड प्रकरणी वनविभागाचे वनक्षेत्रपाल यांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले असल्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा तालुक्यात जोर धरताना दिसत आहे. 

श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव या ठिकाणी मोर या राष्ट्रीय पक्षाची हत्या केल्याची माहिती वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना गुप्त माहितीदारांकडून मिळताच तालुक्यातील अनेक वनरक्षक वनक्षेत्रपाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी पंचनामे केले. त्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी मोराचा एक पाय पिसे तसेच हरणाची कातडी आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मिळाल्याची खात्रीलायक माहिती आहे. तसेच ३ ते ४ जण ताब्यात घेतले आहेत. वनविभाग याच्या माध्यमातून ही कारवाई आज सकाळी झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
यासाठी माहिती घेण्यासाठी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी वनक्षेत्रपाल नातू यांना अनेकदा संपर्क केला असता त्यांनी सायंकाळी ३ वाजेपर्यंत माहिती देतो, कारवाई चालू आहे, अशी उत्तरे दिली. मात्र, त्यानंतर त्यांनी आपला मोबाईल उचलणे बंद केले. याबाबत वरिष्ठ अधिकारी जिल्हा वनरक्षक अरुण रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले. मात्र, त्यांनाही माहिती दिली गेली नाही. त्यामुळे वनक्षेत्रपाल नातू यांनी ही माहिती कोणाच्या सांगण्यावरून आणि कशासाठी लपवली याची सखोल चौकशी करण्याची खरी गरज निर्मण झाली आहे.
माहिती लपवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार -वनमंत्री
 
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव या ठिकाणी मोराची हत्या झाल्याची माहिती माध्यम प्रतिनिधी यांच्याकडून मिळाली आहे. मात्र, या प्रकरणात मोराची हत्या करणारे आरोपी आणि माहिती लपवणारे अधिकारी या दोघांवरही कठोरात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती वनमंत्री(राज्य)दत्तात्रय भारणे यानी मोबाईल वरून दिली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here