प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी बिहार येथील सुशांतच्या पाटण्यातील कुटुंबियांची भेट घेतली. सुशांतच्या वडिलांचे सांत्वन करताना नाना देखील भावूक झाले होते. त्यांचाही कंठ दाटून आला.
नाना पाटेकर हे आज सीआरपीएफच्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी बिहार येथे आले होते. यावेळी त्यांनी सुशांत राजपूतच्या पाटणा येथील घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली.
सुशांत सिंहच्या मृत्यूला आज 14 दिवस पूर्ण झाले आहेत. त्याने आत्महत्या का केली याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करीत आहेत. तर एकता कपूर, करण जोहर, सलमान खान, यांच्या विरोधात न्यायालयात खटलाही भरला आहे.
दरम्यान, बॉलीवूड, भोजपुरी चित्रटातील कलाकार आणि अनेक राजकीय नेत्यांनी आतापर्यंत सुशांतच्या पाटण्या येथील घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.