पाठलाग करुन ४७ लाखाच्या मुद्देमालासह १२ तासांच्या आत अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई
नगर – केडगाव शिवारात दरोडे टाकण ऱ्या गुंडांच्य टोळीला १२ तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरोडेखोरांचेर ही सराईत टोळी सोलापूर महामार्गावरून पळून जात असतांना पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने या दरोडेखोरांना पकडले. त्याच्याकडून ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी १४ आरोपींनाही ताब्यात घेतले ही कारवाई कोतवाली पोलिसांनी केली.

याबाबत समजलेली हकीकत अशी, दि. २८ रोजी फिर्यादी नामे सुनिल विठ्ठल गोंडाळ बय ३८ वर्ष रा दत्तमंदीर समोर नगर पुणे रोड चास ता नगर यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, फिर्यादी यांचे एक्स झोन पार्किंग यार्ड केडगाव येथे दि २८जून रोजी पहाटे ५.४५ बा च्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची विना क्रं ची स्थिफ्ट डिझायर कार व एक बिना क्रमांकाची पांढ-या रंगाची एर्टिगा कारमधून आरोपी सौरभ मोरे व त्याचे सोबत १२ ते १५ अनोळखी इसम यांनी हातामध्ये लाकडी दांडके , लोखंडी रॉड , घेऊन आले व पार्किंगच्या छोट्या गेट वर चढून अनधिकृतपणे आत प्रवेश
करुन गेटवरील वाचमन सुधाकर पाटील यास मारहाण करून त्याचे ताब्यात असणारी मोठ्या गेटची चावी ही बळजबरीने हिसकावून घेऊन गेट उघडून आतमध्ये असलेले दुसरे वोचमन संजय पगारे व अभिषेक गोंडाळ यांना तसेच फिर्यादी यांना लाकडी दांडके, लोखंडी रॉड याने मारहाण करून धाक दाखवून वरील त्यांचे ताब्यातील टाटा ट्रक एम एच ४५ ए एफ३००६ व तीन मोबाईल फोन, असे बळजबरीने चोरी करून नेले आहे, अशी फिर्याद दिल्यावरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुर.नं1 ४५७८/२०२० भादवि कलम ३९५,३९७ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा घडल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना माहिती दिल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पोलीस कंट्रोल रुम अहमदनगर यांच्या मार्फत माहिती व सूचना देऊन नगर जिल्हयातील सर्व चेक पोस्टला तसेच पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथे माहिती कळवून नाकाबंदी लावण्याबाबत कळविले व तसेच तपासा करिता वेगवेगळे पथक तयार करुन त्यांना पुण्याच्या दिशेने आरोपींचा शोध घेणे कामी रवाना केले.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक आरोपींच्या दिशेने रवाना झाले. त्या प्रमाणे केडगाव चौफुला, पुणे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सुपा दूरक्षेत्राचे पोक नगरे तसेच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोसई सतिष शिरसाट व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी सदरची १२ टायर ट्रक क्रं एमएच ४५महा ३००६ थांबवून ड्रायव्हरला खालीउतरुन ताब्यात घेतले असता त्याचे पुढे असणारे स्विफ्ट कार व एर्टिगा कार मधील त्यांचे साथीदार हे भरधाव वेगाने गाड्या चालवून सोलापूर हायवे ने दौंड, सोलापूरच्या दिशेने गाड्यांसह पळाले. त्यानंतर पोसई सतिष शिरसाठ व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी खाजगी वाहनाने आरोपींचा पाठलाग करून पुणे – सोलापूर हायवे वर दौंड पोलीस स्टेशन हद्दीत हाँटेल राजकमलच्या समोर एर्टिगा कार, स्विफ्ट कार या गाड्या अडवून त्यामधील संशयीताचे नाव गाव विचारले असता
त्यांनी त्यांचे नाव १) प्रदिप प्रकाश शिंदे रा मेडसिंगी ता सांगोला जि सोलापूर २) जगदिश बाळासाहेब शिंदे रा मेडसिंगी ता सांगोलाजि सोलापूर ३) लखन धनाजी कांबळे रा अकोला ता सांगोला जि सोलापूर ४) दीपक दगडू शिंदे रा अकोला ता सांगोला जि सोलापूर ५) अजित धोंडीराम मिसाळ रा चिनके ता सांगोला जि सोलापूर ६) नबनाथ मुरलिधर खरकाळे रा अकोला तासांगोला जि सोलापूर ७) सागर बाळू सरगर रा मेडसिंगी ता सांगोला जि सोलापूर ८) निखिल लहु बाळके रा मेडसिंगी तासांगोला जि सोलापूर ९) नवनाथ रमेश पाटील रा ओलेगाव ता सांगोला जि सोलापूर १०) मनोहर शिवाजी सरपळे राआंधळगाव ता मंगळवेडा जि सोलापूर ११) हनुमंत मारुती गाबडे रा बारेगाव ता सांगोला जि सोलापूर १२) अजय सितारामभोसले रा वारेगाव ता सांगोला जि सोलापूर १३) सौरभ सुखदेव मोरे रा आंधळगाव ता मंगळवेडा जि सोलापूर १४) प्रदिपबाळासाहेब शिंदे रा मेडसिंगी ता सांगोला जि सोलापूर असे सांगितले तसेच त्यांचे गाड्यांची झडती घेतली असता स्वीफ्ट कारमध्ये १ लोखंडी पाईप, एक लाकडी दांडा, एक काटी असे ब एर्टिगा कारमध्ये एक लोखंडी रॉड , लोखंडी पाईप, लाकडी मोडलेली पट्टो, कापडात बांधलेला दगडाची गोफन व १४ मोबाईल असा एकुण ४७,७०,१९५० रु ( अक्षरी सत्तेचाळीस लाखसत्तर हजार एकशे पन्नास रु मात्र ) किमतीचा मुद्देमाल आरोपींकडे मिळून आल्याने त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि रणदिवे हे करित आहेत. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेबर दाखल गुन्ह्यांची माहिती पुढील प्रमाणे आरोपी नामे जगदिश बाळासाहेब शिंदे याच्या वर मोहोळ पोलोस स्टेशन येथे भार्दाब ३९२.३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे कोल्हापूर जयसिंगपूर पोस्टे येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी नामे नवनाथ मुरलिधर खरकाळे व दीपक दगडू शिंदे याच्यावर१९१) गुरनं ७७६/२०१६ भादवि १४३,१४७,३२६,३४१,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपी नामे नवनाथ रमेश पाटील याच्यावर स्पेशल रिलोफ ऑक्ट ३९ सोआरपोसो ४५७ प्रमाणे सांगोला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
आहे.
ही कारवाई पोनि. प्रविण लोखंडे, व गुन्हेशोध पथकाचे पोसई सतिश शिरसाठ, पोना गणेश धोत्रे, पोना शाहीद शेख,पोना नितीन शिंदे, पोरका सुजय हिवाळे, पोकाँ भारत इंगळे, पोकाँ बापुसाहेब गोरे, पोकॉ लहाणे, पोर्कौ प्रशांत राठोड, पोलीस स्टेशन सुपा दुरक्षेत्रचे पोकॉ नगरे यांनी केली आहे.