Newasa : गावठी कट्ट्यासह आणखी एक आरोपी पुणे येथून जेरबंद

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई पोलिसांची दमदार कामगिरी

सोनई पोलिसांनी दि २५ रोजी घोडेगाव येथून केदार यास गावठी कट्टा विक्रीसाठी आला असताना पाठलाग करून पकडले. ही घटना ताजी असतानाच केदार याची कौशल्याने चौकशी करुन त्याचा मित्र विजय बाळू सोनवणे रा. आदर्श नगर उरळी देवाची ता हवेली, जि. पुणे याची पूर्ण माहिती घेऊन सोनई पोलिसांचे एक पथक हडपसर येथे जाऊन तेथील पोलिसांची मदत घेऊन आरोपी सोनवणे यास उरूळी देवाची शिताफीने अटक करुन त्याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून सदर आरोपीस सोनई पोलिस ठाण्यात आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपीस नेवासा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. या आरोपीवर श्रीगोंदा व हडपसर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे उप विभागीय अधीक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलिस ठाण्याचे स.पो.नि जनार्दन सोनवणे स.पो.नि ज्ञानेश्वर थोरात चव्हाण दत्ता गावडे, शिवाजी माने, विठ्ठल थोरात  बाबा वाघमोडे, या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी यशस्वी केली या कामगिरीचे सोनई परिसरातून सोनई पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

राष्ट्र सह्याद्रीचा अंदाज खरा ठरला घोडेगाव व खेडले परमानंद येथे गावठी कट्ट्यासह आरोपी पकडले. त्यावेळी हे खूप मोठे रॅकेट ऊघडकीस येण्याची शक्यता, असे भाकीत राष्ट्र सह्याद्रीने केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here