Karjat : तरसाच्या हल्यात शेतक-यासह लहान मुलगी जखमी…

2
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे थेरगाव-निमगाव गांगर्डा रस्त्यालगत असलेल्या आपल्या शेतात दुचाकीवरून जात असलेल्या शेतक-यावर व त्याच्या लहान मुलीवर अचानकपणे तरसाने हल्ला केल्याने दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. जखमी दोघा जणांना नगर येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, निमगाव गांगर्डा येथील शेतकरी आबासाहेब हनुमंत कडिॅले (वय 35) व मुलगी स्नेहल आबासाहेब कडिॅले (वय 12) हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात दुचाकीवरून जात असताना रस्त्याच्यालगत असलेल्या झुडपात दबा धरून बसलेल्या तरसाने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला. असता दुचाकीवरील हे दोघेजण खाली कोसळले. तोपर्यंत तरसाने मुलीला चावा घेतला.
हे पाहताच शेतकरी कर्डिले यांनी घाबरलेल्या अवस्थेत तरसाला दोन्ही हाताने पकडून जमिनीवर आपटले व तसेच दाबून धरले. यावेळी चावथाळलेल्या तरसाने कर्डिले यांना चावा घेवून जखमी केले. ही माहिती समजताच प.स.सदस्य बाबासाहेब गांगडेॅ, डाॅ.दत्तात्रय अनभुले, पप्पू गांगडेॅ, शरद गांगडेॅ यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अरणगावचे निहातक्षेत्र अधिकारी किशोर गांगडेॅ यांच्याशी येथील ग्रामस्थांनी संपर्क साधला असता ते तात्काळ घटनास्थळी आले. नंतर दोघे जखमींना नगर येथे हलविण्यात आले. तरस पिसाळलेले असल्याची चर्चा नागरिकांत होत होती.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here