प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
90 वर्षांच्या आजीबाईसह अहमदनगर जिल्ह्यात आज 4 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यात अहमदनगर मनपा क्षेत्रातील ३ आणि श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३११ झाली असून उपचार घेत असलेले रुग्ण 140 इतके आहेत. तर आज सकाळी आज सकाळी जिल्ह्यात १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहर 07, अकोले तालुका 02 आणि संगमनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

नगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील 30 वर्षीय पुरुष, सुडकेमळा येथील 50 वर्षीय महिला आणि पदमा नगर येथील 57 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 11 वर्षाचा मुलगा आणि 30 वर्षाचा युवक बाधित आढळून आला आहे.यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हे सर्व रुग्ण आहेत.
HP 64GB Class 10 MicroSD Memory Card (HP-MSDCWAU1-64GB)
₹ 650.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)pTron Bassbuds in-Ear True Wireless Bluetooth 5.0 Headphones with Hi-Fi Deep Bass, 20Hrs Playtime with Case, Ergonomic Sweatproof Earbuds, Noise Isolation, Voice Assistance & Built-in Mic - (Black)
₹ 699.00 (as of January 24, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील 26 वर्षीय युवक आणि 17 वर्षीय युवती बाधित आढळून आली आहे. हे दोघे रुग्ण मुंबईहून प्रवास करून आले होते. संगमनेर तालुक्यातील कुरण येथील 35 वर्षीय युवक बाधित आढळून आला आहे. हा रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.
*जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांची संख्या: १५०*
*मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या: १४*
*जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या: ४७५*
*कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३११*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)*