Ahmednagar Latest Corona Updates : जिल्ह्यात आज दुपारी वाढले पुन्हा २५ कोरोना बाधित

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये एकूण २५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात नगर शहरातील १४, राहुरी तालुका ०४, बीड जिल्हा-०१, पाथर्डी तालुका ०१, कोपरगाव ०३, राहाता तालुका ०१ आणि श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बाधित आढळले आहेत.

नगर शहरातील तोफखाना भागातील १०, ढवणवस्ती येथील ०२ केडगाव येथील ०१ आणि भूषणनगर येथे ०१ रुग्ण आढळून आला आहे. याशिवाय, राहुरी तालुक्यातील केसापूर येथे ०३, वांबोरी येथे ०१ रुग्ण आढळला आहे. शिरुरकासार (जि. बीड) येथील एक व्यक्ती बाधित आढळला आहे.

पाथर्डीमधील वामनभाऊनगर येथे एक बाधित रुग्ण, कोपरगाव येथील श्रीकृष्णनगर येथील ०१ आणि ओमनगर येथील ०२, शिर्डी (ता. राहाता) येथील ०१, आणि खैरे निमगाव (ता. श्रीरामपूर) येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटीव आढळून आला आहे.

भिंगारमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

नगर : कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिंगार शहरामधील लोहार गल्ली, मुळे गल्ली, गवळीवाडा हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. १४ जुलैपर्यंत हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून राहील. तर सदर बाजार व भिंगार हे बफर झोन म्हणून जाहीर केलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here