प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कोरोनिलमुळे ड्रग माफिया, तसेच भारत विरोधी शक्ति मल्टीनॅशनल कंपन्यांना मोठा हादरा बसला आहे. आम्ही केवळ क्लिनिकल ट्रायलचा डाटाची माहिती दिली तर इतका मोठा गदारोळ झाला. भारतात योग व आयुर्वेदावर काम करणे अपराध आहे, असे आता मला वाटायला लागले आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया योगगुरू रामदेव बाबा यांनी दिली आहे.
23 जूनला कोरोनावरील कोरोनिल हे औषध लाँच करून रामदेव बाबा यांनी आपण कोरोनावरील औषध शोधून काढल्याचा दावा केला होता. त्यानंतर मोठे वादंग उठले होते. राजस्थान व महाराष्ट्रात तर हे औषध बॅन करण्यात आले होते. या सर्वांवर बाबांनी अखेर मौन सोडले आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बाबा म्हणाले आम्ही चांगले काम केले आहे. तरीही लोक आम्हाला शिव्या देत आहेत. आम्हाला त्याबद्दल राग नाही. मात्र, या औषधामुळे जे कोरोना रुग्ण बरे झाले त्यांच्याबाबत तरी सहानुभूती बाळगा. आम्हाला सत्कार नको पण तिरस्कार तरी करू नका, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
लायसेंसवर रामदेव बाबा म्हणतात…
रामदेव बाबा म्हणाले की, आयुर्वेद औषधं बनवण्याचं यूनानी आणि आयुर्वेद विभागाचं लायसन्स आम्ही घेतलं आहे. कोरोनिल औषधाच्या प्रयोगासाठी ज्यांची परवानगी घ्यायची होती, त्या सर्वांचे प्रमाणमंत्र आम्ही आयुष मंत्रालयाकडे सुपूर्द केले आहेत”, असं रामदेव बाबा म्हणाले. ते म्हणाले आयुर्वेदातील सर्व औषधांचं रजिस्ट्रेशन त्यांच्या परंपरागत गुणांच्या आधारवर होतं. ते म्हणाले कोरोनिल औषधासंदर्भात सर्व रिसर्च आयुष मंत्रालयाला दिला आहे, ज्यांना पाहायचा आहे, ते पाहू शकतात. आम्ही मॉडर्न सायंसच्या प्रोटोकॉलमुसार रिसर्च केला आहे.
… आचार्य बालकृष्णांचे मात्र युटर्न
कोरोनावरी औषध शोधले असून 7 दिवसात 100 टक्के रुग्ण बरा होतो, असा दावा पतंजलीने केला होता. मात्र एकूणच झालेल्या वादानंतर आचार्य म्हणाले आम्ही असे म्हणालोच नाही की आम्ही कोरोनावरी औषध शोधले आहे. आम्ही तयार केलेल्या औषधांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये रुग्ण 3 दिवसांत 69 टक्के तर 7 दिवसात 100 टक्के बरे झाले, ही माहिती आम्ही सर्वांसमोर मांडली, असे बालकृष्णांचे म्हणणे आहे.