प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कोपरगाव शहरात वर्तमानात कोणताही रुग्ण नसताना आता मात्र धक्कादायक घटना उघड झाली असून कोपरगाव शहरातील खडकी रस्ता मार्गावर असलेल्या एका खाजगी डॉक्टरला (वय-४५) व त्यांच्या वडिलांना (वय-७२) या दोघाना कोरोना विषाणूची बाधा झाली असून या खेरीज कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत मुंबईहून आलेल्या एका पाहुण्याला (वय-४६) कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने कोपरगाव कोरोना केंद्रात हलविण्यात आले असून हा परिसर तालुका प्रशासनाने सील केला आहे.

कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.मात्र मध्यन्तरी एका महिला डॉक्टरचा अपवाद वगळता तालुका निरंक राहिला असताना आज करंजी येथील मूळ निवासी असलेला मात्र नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी आरोग्य विभागात शासकीय सेवेत असलेल्या एका रुग्णाची भर पडली होती त्यानंतर कोपरगाव शहर व तालुक्यात आता मागील आठवड्यात दि.२० जून रोजी दोन रुग्ण आढळल्यानंतर आता रुग्ण नाही, असा दिलासा मिळाला असताना आता सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत मूळचे रहिवासी असलेले मात्र नाशिक येथे आजार पणामुळे तपासणीसाठी गेलेले तेथून त्यांची रवानगी शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत केलेल्या पंचेचाळीस वर्षीय रुग्णांचा श्राव तेथीलआरोग्य विभागाने नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला असता तो व्यक्ती बाधित असल्याने निष्पन्न झाल्याचे निष्पन्न झाले होते.
त्याच्या संपर्कात आलेल्या सात जणांचे अहवाल कालच निरंक आले असताना परवा खडकी रस्ता मार्गावर आपला खाजगी डॉक्टरकीचा व्यवसाय करणारे एक डॉक्टर व त्यांचे वडील हे दोघे तालुका प्रशासनाने संशयित म्हणून ताब्यात घेतले होते.व त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते त्यांचा अहवाल आज दुपारी आला असून त्या दोघाना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या खेरीज तालुक्याच्या उत्तरेस टाकळी ग्रामपंचायत हद्दीत एका कुटुंबाकडे मुंबई येथून एक पाहूणा भेटण्यास आला असताना त्यांना या विषाणूची लक्षणे आढळून आल्याने त्यांना तालुका प्रशासने ताब्यात घेऊन त्यांचा श्राव तपासणीसाठी पाठवला असता तो बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी तालुका व शहर आरोग्य प्रशासनाने तत्काळ या खडकी रस्ता व टाकळी ग्रामपंचायत हद्दीत धाव घेऊन या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य संशयित नागरिकांनाचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे.व प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु केल्या आहेत.