Newasa : काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी रंजन जाधव

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
नेवासा फाटा – काँग्रेसच्या नेवासा शहराध्यक्षपदी रंजन दाजीराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी जाधव यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले आहे. 
एक वर्षांपासून रिक्त असलेल्या काँग्रेसच्या नेवासा शहराध्यक्षपदी प्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते रंजन (दादा) दाजीराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र आज जाधव यांना देण्यात आले. स्व. वसंतराव होंडे सामाजिक-शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेत सक्रिय असलेल्या जाधव यांच्यावर काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्याने सर्वच स्तरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
जाधव यांच्या नियुक्तीवेळी काँगेस कमिटी तालुकाध्यक्ष संभाजीराजे माळवदे, जिल्हा कार्यध्यक्ष कमलेश गायकवाड, तालुका सरचिटणीस प्रविण तिरोडकर, तालुका अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष मौलाना तन्वीर शेख, तालुका संघटक संदीप मोटे, तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here