प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
संयुक्त राष्ट्र परिषदेत कराची हल्ल्यासाठी भारताला दोषी ठरवण्याचा पाक-चीनचा डाव जर्मनी-अमेरिकेच्या साथीने उधळून लावला.
कराची स्टॉक एक्सचेंजवर 1 जुलैला दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये सुरक्षारक्षकांसह 10 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा निषेध करण्याचा प्रस्ताव चीनने मांडला होता. त्यात भारत या हल्ल्याला जबाबदार असल्याचा खोटे आरोप करण्यात आले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या संसदेत असे खोटे आरोप केले होते. मात्र, चीनने हा प्रस्ताव मांडला होता. यावर सर्वप्रथम जर्मनीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर अमेरिकेनेही आक्षेप घेतला. या हल्ल्याचा भारत काय कोणत्याही देशाचा संबंध नाही. असे जर्मनी, अमेरिकेने ठणकाऊन सांगितले.
त्यामुळे संयुक्त राष्ट्र परिषदेत गोंधळ उडाला. अखेर या गोंधळानंतर फक्त निषेधाचा ठराव पारित करण्यात आला. त्यामुळे चीन व पाकिस्तान यांनी केलेल्या अभद्र युतीचा डाव चांगलाच उधळला.