Kada : पिंपळा व धानोरा परिसराला पावसाने झोडपले

0
दुष्काळी भागात पावसाने केले समाधान
कडा: आष्टीसह तालुक्यात झालेल्या पावसाने पिंपळा व धानोरा परिसराला चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यात सर्वाधिक पाऊस या दोन मंडळांत झाला असून, दुष्काळी स्थितीचा सामना करणार्‍या या भागाला या जोरदार पावसाने दिलासा मिळाला आहे.

आष्टी तालुक्यात मागील चार-पाच दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी दोन-तीन दिवस तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यात आष्टी मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. दोन दिवसात तालुक्याच्या बहुतांश भागात पाऊस झाला. त्यानंतर सोमवारपासून शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. रात्रभर थोड्याफार फरकाने तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नद्याओढे खळाळून वाहत असून, छोटेमोठे बंधारे तुडुंब भरले आहेत.

आष्टी मंडळासह कडा, धानोरा, दौलावडगाव, धामणगाव, पिंपळा, टाकळसिंग या सर्व मंडळांत काल पावसाने हजेरी लावली. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस पहाटेपर्यंत कोसळत होता. त्यातील पिंपळा व धानोरा या मंडळांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्या तुलनेत टाकळसिंग व धामणगाव या मंडळांत हा पाऊस कमी प्रमाणात झाला.
मंडळनिहाय आकडेवारी
(कंसात एकूण पर्जन्यमान)
आष्टी 60 मिमी. (431 मिमी.)
कडा 36 (184)
धामणगाव 14 (200)
दौलावडगाव 43 (229)
पिंपळा 75 (288)
टाकळसिंग 17 (158)
धानोरा 78 मिमी. (241 मिमी.)
आष्टी मंडळ आघाडीवरच
रविवारी व सोमवारी रात्री झालेल्या पावसाने आष्टी मंडळातही जोरदार हजेरी लावून जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस होणारे मंडळ हे स्थान कायम ठेवले आहे. सोमवारी रात्री आष्टी मंडळात 60 मिलीमीटर पाऊस झाला असून, एकूण 431 मिलीमीटर आकडेवारीसह आष्टी मंडळ जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडलेले मंडळ म्हणून कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here