Crime : अकोलेसाठी गुरुवार ठरला घातवार; तीन आत्महत्या व एक खून

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अकोले तालुक्यात गुरूवार ठरला घातवार एकाच दिवशी तिन आत्महत्या व एक तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

अकोले तालुक्यात चार घटना घडल्या आहे. तालुक्यासह जिल्हा हादरून देणारी क्रुर घटना म्हणजे वाकी शिवारात 25 ते 30 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात तरुणाची अमानुषपणे हत्या करून त्याच्या शरीराचे लखतरे तोडून एकदम तुकडे-तुकडे करून एका गोणपाटात भरून वाकी येथील कृष्णावंती नदीपात्रात निर्दयीपणे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. याबाबत वाकी गावचे पोलिस पाटील यांनी राजुर पोलिस स्टेशनला खबर दिली आहे.खबर मिळताच  सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरूवात केली आहे. या घटनेमुळे वाकी शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहीती मिळताच गांभिर्याने अतिरिक्त  पोलीस  अधिकारी सागर पाटील, उपविभागीय  पोलीस अधिकारी  रोशन पंडित यांनी तात्काळ राजुरला येवून साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार,दिपक ढोमणे,प्रकाश निमसे  यांना बरोबर घेऊन घटनास्थळी भेट दिली आहे.सदर घटनेने खळबळ उडाली असुन पोलिसांपुढे मयत तरुणाचा शोध व हत्या करणाऱ्याचा शोध घेणे असे दुहेरी आव्हान आहे.

दुसरी घटना म्हणजे  काल राञी उशिरा दाखल झालेली राजुर येथील प्रतिभा अनिल पवार (वय 35 वर्षे )या विवाहित महिलने विरगाव येथे माहेरी येवून  मणक्याच्या आजाराला ञासुन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.याबाबत अनिल काशिनाथ डोळस (रा.विरगाव)यानी सदर महीलेला गेली पाच वर्षापासून मणक्याच्या आजाराचा खूप त्रास होता.डॉक्टरकडे उपचार घेऊन तिला बरे वाटत नव्हते मणक्याच्या तिव्र वेदनेमुळे त्रासलेली होती म्हणून तिने माहेरी विरगाव येथे येवून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असलयाची खबर दिल्याने अकोले पोलिस ठाण्यात अकस्मात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलिस हवालदार बाबासाहेब भोसले करत आहे.

तिसरी घटना विरगाव येथीलच ४० वर्षिय भाऊसाहेब दत्तात्रय भालेराव यांनी आज दि २ जुलै २०२० रोजी सकाळी ९ वा दरम्यान विरगाव शिवारात गणेश सांगळे यांच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची  खबर मयताचा पुतण्या सचिन सुनील भालेराव यांनी दिल्याने अकस्मात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पो.ना.गोराणे करत आहे.
चाैथी घटना अकोले शहरातील इंदिरानगर येथे १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.याबाबत महेश रंगनाथ शिंदे यानी खबर दिली असुन यात म्हटले आहे कि त्याची मामे बहीण नम्रता उर्फ वैष्णवी नंदकुमार पांडे(वय 19 वर्षे,रा.इंदिरानगर,अकोले)ही आज दि २ जुलै २०२० दुपारी ३:३० सुमारास त्यांचे राहते घराचे पाठीमागील पडक्या घरात अंगातील काळया रंगाची ओढणी ने पडक्या घराचे छताचे लाकडी खांबाला गाठ बांधून गळफास घेऊन मयत झाले आहे. या खबरीवरुन अकोले पोलिसांत अकस्मात दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेचा तपास पो.नि.जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॅा.जबीर सय्यद करत आहे. दरम्यान, रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी घटनास्थळी भेट दिली असून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here