Shrigonda Breaking : घोगरगाव येथे किरकोळ वादातून खून; आरोपी फरार

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील घोगरगाव या ठिकाणी किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन एक जणाचा जागीच खून करण्यात आला आहे. घटनास्थळी काही वेळातच पोलीस दाखल होण्याची प्राथमिक माहिती आहे.

सुनील माणिक तरटे (वय 40), असे मयताचे नाव आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव या ठिकाणी वेशीसमोर अहमदनगर सोलापूर हायवे वर किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर झाले. यामध्ये सुनील यांना रस्त्यावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटनास्थळी मुकेशकुमार बडे यांनी धाव घेतली असून काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचतील, अशी प्राथमिक माहिती आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून यातील सर्वच आरोपी फरार झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here