Human Interest : याराना असावा तर असा!

0

पितृत्व हरवल्यावर वडिलांच्या मित्रांनी केली मदत, वर्गणीतून लहान मुलीसाठी काढली पॉलिसी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील टाकळी कडे येथील राजेंद्र चव्हाण हे नोकरीकामी पुणे येथे वास्तव्य करत होते. मात्र, काळाने त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी घाला घातला आणि त्यात ते मरण पावले. त्यावेळी सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्यासाठी राजेंद्र चव्हाण यांचा मित्रपरिवार समोर आला आणि चव्हाण यांच्या 2 वर्षाच्या मुलीला सुरक्षा कवच म्हणून तिची सर्व मित्रांनी मिळून पॉलिसी काढली आहे. त्यांच्या या कार्याचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

श्दार तालुक्यातील टाकळीकडे या ठिकाणी राहणारे तसेच नोकरी कामी पुणे या ठिकाणी वास्तव्यास असलेले राजेंद्र चव्हाण याच्यावर अचानक काळाने घाला घातल्याने त्यांच्या संसारवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यातून त्यांचे कुटुंब सावरत होते. ही बाब त्याच्या वर्ग मित्राच्या लक्षात आल्यावर सर्व मित्रांनी मिळून पितृत्व हरवलेल्या लहानग्या मुलीला वर्गणी करून मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार नानासाहेब कारंडे 5000 रुपये, शहाजी खामकर 5000  रुपये. हनुमंत भुजबळ 5000 रुपये विक्रम धाकतोडे 5000 रुपये. संजय बेलेकर 3000 रुपये रेवनाथ नलावडे 2501 रुपये संदीप नवले. 2100 रुपये भाऊसाहेब खामकर. 2150 रुपये बाळासाहेब गिरीगोसावी..2001 रुपये अमोल नवले 2001रुपये.

मानसिंग नवले.2001 रुपये संदीप गोरे 2001 रुपये. राजेन्‍द्र रणसिंग 2000 रुपये.बिभीषण राऊत.2000 रुपये.सतीश भुजबळ.2020 रुपये राजू पठाडे 2000 रुपये संजय भोसले2000 रुपये संदीप भदे.1111 रुपये.किशोर मचे1000 रुपये. अशी एकूण  49883..रुपये जमा झाली. त्यातून राजेंद्र चव्हाण यांच्या २ वर्षाच्या लहान मुलीच्या नावावर सुमारे एकरकमी 49869 रु याची विमा पॉलिसी काढण्यात आली आहे. त्याची पावती आज सायंकाळी ५ वाजता राजेंद्र चव्हाण यांच्या पत्नीच्या हातात दिली गेली आहे.

पावती हातात घेताना राजेंद्र चव्हाण यांच्या पत्नीचे डोळे पाणावले होते. तसेच त्याच्या डोळ्यातून मोठ्या प्रमाणात अश्रुधारा वाहू लागल्याने त्यावेळी सर्वजण भावूक होऊन अनेकांचा अश्रूचा बांध फुटलेल्या अवस्थेत पाहण्यास मिळाले. त्यामुळे या कामाची सर्व मित्र परिवारात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले होते. तसेच सर्वच स्तरातून सर्व वर्ग मित्राचे कौतुक करण्यात येत होते.

…आयुष्यात असे अनमोल मित्र कमावले म्हणून कदाचित चव्हाण यांच्या जीवात्माचेही डोळे भरून आले असतील.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here