National : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला लेह-लडाखचा दौरा; जवानांचे मनोबल उंचावले

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

गलवान खो-यातील चकमकी नंतर वाढलेल्या भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक लेह-लडाखचा दौरा केला. त्यामुळे निश्चितच सीमेवरील जवानांचे मनोबल उंचावणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्य संरक्षण सचिव बिपीन रावत हे देखील लेहच्या दौ-यावर आहेत. प्रत्यक्ष पंतप्रधान यांनी दौरा केल्याने भारतीय जवानांचे मनोबल तर उंचावणार आहेच पण यासोबतच चीनी सैन्याचे मनोधैर्याचे खच्चीकरण होईल. चीनी राष्ट्राध्यक्ष थेट सीमाभागात येत नसल्याने त्यांच्या जवानांमध्ये चिनी सरकारने आपल्याला वा-यावर सोडले आहे, असा संदेश जाणार आहे.

यावेळी पंतप्रधानांनी उपचार घेत असलेल्या जवानांची भेट घेऊन विचारपूस केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पंतप्रधान मोदींसह मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे हे एकाचवेळी दाखल झाल्याने, भारताची आक्रमक भूमिका दिसून येत आहे. सीमा भागाचा आढावा घेत पंतप्रधानांनी भारत हा कोणत्याही संघर्षाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे, असे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here