Shrirampur : बेवारस मनोरुग्णांसाठी पोलिसांची माणुसकी

1

प्रतिनिधी | राजेंद्र उंडे | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर शहरातील बेवारस मनोरूग्ण लाँकडाऊन पासून उपाशी पोटी राहुण हताश झाले होते.अन्नाच्या शोधात  फिरणाऱ्या मनोरुग्णाच्या पोटाला आधार देण्यासाठी अतिरीक्त पोलीस अधिक्षक कार्यालयातील पो.हे.काँ. राजेंद्र गोडगे  यांच्यासह त्यांच्या मिञांनी  मनोरुग्णांसाठी अन्नाचे पाकीटे तयार करुन शहरातील विविध भागातील मनोरुग्णाचा शोध घेवून त्यांना दोन वेळचे अन्नाचे पाकीटे पुरवून पोलीसातील माणुसकी धर्म कृतीतून दाखवून दिला.

श्रीरामपूर शहरातील विविध भागात मनोरुग्ण अढळून येतात.लाँकडाऊन पासुन हे मनोरुग्ण उपाशी असल्याचे जाणवत होते. अन्नाच्या शोधात मनोरुग्ण रस्त्यावर दिसू लागले. लाँकडाऊन पुर्वी हाँटेल ,खानावळ, वडापाव  आदी ठिकाणाहून या मनोरुग्णांना पोटापुरते अन्न मिळत होते. परंतू लाँकडाऊन चालू झाल्या नंतर माञ मनोरुग्णांना अन्न मिळेना अन्नाच्या शोधात मनोरुग्ण हिंडताना दिसू लागले. याकडे पो.हे.किँ. राजेंद्र गोडगे यांचे लक्ष गेले.

मनात सहज कल्पना आली मनोरुग्णासाठी अन्नाच्या पाकीटांची व्यवस्था करण्याचे ठरविले. या गोष्टीची कल्पना गोडगे यांनी संजय पवार, संदिप पवार, रमेश चंदन यांना दिली. त्यांनी या कल्पनेला  मुर्त स्वरुप देण्याचे ठरविले.या सर्वांनी स्वतःच्या खिशातुन निधी जमविला  दोन वेळच्या अन्नाच्या पाकीटांची व्यवस्था केली. मनोरुग्णाचा शोध घेवून त्यांना अन्नाचे पाकीटे देण्याची धडपड सुरु केली.पोलीस खात्यातील आपले काम सांभाळून मनोरुग्णांची दोन वेळच्या अन्नाच्या पाकीटे पोहच करण्याची सेवा नियमित सुरु ठेवली.

पोलीस खात्यातील कामामुळे वेळ मिळाला नाही तर पो.हे.काँ.गोडगे यांचे मिञ संदिप पवार, रमेश चंदन, संजय पवार यांनी मनोरुग्णांना  अन्नाचे पाकीटे पोहच केली.मनोरुग्णांच्या अन्नाच्या पाकीटासाठी  कधी अन्नछञलयातून, तर कधी बाहेरगावच्या मजुरांसाठी बनविलेल्या भोजन व्यवस्थेतुन , तर कधी मिञांच्या घरुन अन्नाच्या पाकीटींची व्यवस्था करण्याची नित्याची धडपड सुरु झाली.दोन वेळचे अन्नाचे पाकीटे पुरवून पोलीसातील माणुसकी धर्म कृतीतून दाखवून दिला.

माणुसकी…. हाच धर्म

लॉकडाऊन काळात अतिरीक्त पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या समवेत शहरात गस्त घालत असताना अनेक ठिकाणी मनोरुग्ण खिन्न अवस्थेत पडलेले दिसले. यातील एक मनोरुग्ण इशारेद्वारे  जेवण मागत असताना माझ्यातील पोलीस माणुसकी जागी झाली. काही झाले तरी मनोरुग्णाच्या एक वेळची जेवणाची व्यवस्था करण्याचे ठरवले. मिञांना हि कल्पना बोलून दाखविली. मिञांनी क्षणाचा विलंब नलावता  त्यास होकार देवून पहिल्या दिवशी तर एका हॉटेल चालकाचे घर गाठले. 50 ते 60 वडेपाव करुन देण्याची विनंती केली त्यानुसार वडेपाव वाटप करुन मनोरुग्णांच्या पोटाला आधार देण्याचे  माणुसकीच्या धर्मातून केले.

–  राजेंद्र  गोडगे पो.हे.कॉ. अतिरीक्त पोलीस अधीक्षक कार्यालय

1 COMMENT

  1. माणुसकी वेगेरे काही नाही… संपूर्ण घटना लक्षात घ्या. विशाल फोपळे यांचे चिरंजीव वरून फोपळे आणि मी स्वतः उज्ज्वल चव्हाण , आम्ही दोघांनी आषाढी एकादशी निमित्त पोलीस स्टेशन ला फराळाचे पाकीट भेट दिले होते. त्या दिवशी म्हणजे एकादशी च्या दिवशी स्टाफ नसल्यामुळे ते पडून राहिले म्हणून , गोडगे यांनी रस्त्यावर वाटप केले. खरी जाहिरात आणि प्रसिद्धी आमची व्हायला पाहिजे ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here