Ahmednagar : नगरमध्ये १४ जणांना कोरोना; जिल्ह्यात २४ रुग्ण

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नगर : जिल्ह्यात आज २४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यात नगर शहरातील १४ जणांचा समावेश आहे भिंगारमध्ये ही दोन रुग्ण आढळून आले आहेत. 

नगर शहरातील १४, भिंगार ०२, संगमनेर तालुका ०२ (कुरण आणि एस. बी. चौक, संगमनेर), भातकुडगाव (शेवगाव) ०१, दाढ बु. (राहाता) ०१,  खेरडे (पाथर्डी) ०१, भोंदरे (पारनेर) ०१, केसापुर (राहुरी) ०१, कोळगाव (श्रीगोंदा) ०१ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील ३७ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ३२, अकोले तालुका ०२, जामखेड, राहाता, संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here