प्रभाग व भागनिहाय ३२८ दुकाने त्यांचे पत्ते, नियुक्त कर्मचारी यांचे संपर्क क्रमांकांची आदेशासोबत यादी प्रसिद्ध
Needly App सुविधेसाठी लाँच

pTron Tangent Lite Bluetooth 5.0 Wireless Headphones with Hi-Fi Stereo Sound, 6Hrs Playtime, Lightweight Ergonomic Neckband, Sweat-Resistant Magnetic Earbuds, Voice Assistant & Mic - (Black)
₹ 599.00 (as of January 27, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)OnePlus Nord 5G (Gray Onyx, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 27,999.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)बीड – शहरात ०८ दिवसांसाठी ९ जुलै रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत जीवनावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने प्रभाग व कॉलनीनिहाय दुकानांची यादी जाहीर करणेत आली आहे. तसेच शासकीय कार्यालय व मा. न्यायालयाचे कामकाजाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्देश दिले आहेत.
यामुळे नागरिकांना घराबाहेर पडून अत्यावश्यक किराणा सामानांची खरेदी करणेस अडचण निर्माण होत आहे.
बीड शहरातील जीवनावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने किराणा दुकानांची त्यांच्यासाठी नेमलेल्या प्रभाग, कॉलनी, गल्ली निहाय यादी ज्यात संबंधित नेमलेल्या दुकानांचे नांव, पत्ता, मोबाईल क्रमांक व दुकानावर नियुक्त कर्मचारी यांचे नांव मोबाईल क्रमांक निहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


नागरिकांनी केवळ अत्यंत आवश्यक किराणा सामान जसे की, तेल, गहू, साखर, तांदूळ इत्यादी वस्तूंचीच मागणी त्यांच्यासाठी नेमलेल्या किराणा दुकानदार यांचेकडेच नोंदवावी. नागरिकांनी संबंधित दुकानदार यांच्याकडे अनावश्यक वस्तू परफयुम, कॉसमेटीक्स आदीची सामानाची मागणी करु नये.
संबंधित दुकानावर मागणी नोंदविल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकळी ०९.०० ते दु. १२.०० वा पर्यंत सामानाची घरपोच डिलेव्हरी नियुक्त कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येईल. अशा सुचना संबंधित कर्मचारी व दुकानदार यांना देण्यात आलेल्या आहेत.
नागरिकांनी दुकानदारांशी बिलाविषयी चर्चा करावी मगच मागणी नोंदवावी. दुकानदारांकडे Paytm, Googlepay किंवा ऑनलाईन सुविधा असेल तर त्याचा वापर करुनच व्यवहार करावा, अन्यथा कर्मचारी घरी सामान देण्यासाठी आल्यावर
त्यांच्याकडे समक्ष रक्कम स्वत: एका पॉकीटात भरावी व दयावी. दुकानदारांनी सदरील रक्कम काळजीपूर्वक हाताळावी.
सर्वांनी चेहऱ्यावर मास्क, रुमाल बांधावा, सॅनीटायझर, साबणाचा वांरवार वापर करावा. सामाजिक अंतर राखावे आणि कोवीड विषयक सर्व खबरदारी घ्यावी. दुकानदारांनी सामानाचे दर जास्त आकारल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
नागरिकांचा त्यांच्या प्रभागातील दुकानदारांशी संपर्क होणार नाही. त्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेली यादीत समाविष्ट कर्मचारी यांचेशी त्यांच्या प्रभाग क्रमांकाप्रमाणे संपर्क साधावा.
यासह नागरिकांनी Needly App चा वापर त्यांचे प्रभागातील दुकानदारांशी चर्चा करुनच करावा. सदरील अॅपवर नागरिकांना साहित्याचे दर देखील पाहता येतील.
*शासकीय कार्यालय व मा.न्यायालयाचे कामकाजा बाबत खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत*
१.बँकेचे कर्मचारी यांनी त्यांचे केवळ अंतर्गत व महत्त्वाच्या कार्यालयीन कामकाजासाठीच त्यांचे बँकेचे ओळखपत्र वापरुन कामकाज करणेस परवानगी देण्यात येत आहे. कोणत्याही ग्राहकाला त्यांनी प्रत्यक्ष सेवा देऊ नये.
२. किरकोळ किराणा, घाऊक किराणा व्यापारी व कृषी घाऊक व्यापारी यांनी ऑनलाईन पास काढण्यासाठी त्यांनी अर्जासोबत शॉप अॅक्टची कॉपी/लायसन्स अपलोड करावे व पास प्राप्त झाल्यानंतर दुकान वरील प्रमाणे केवळ घरपोच सेवेसाठी चालू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. कोणत्याही ग्राहकास या दुकानांवर येण्यासाठी संपूर्ण मनाई आहे. किरकोळ किराणा
व्यापाऱ्यांना सकाळी ८.३० ते दु.१२.३० वा व घाऊक किराणा व्यापाऱ्यांना व घाऊक कृषी व्यापाऱ्यांना सकाळी ०९ ते संध्याकाळी
०४.०० वा. पर्यंत परवानगी पास द्वारेच देण्यात येईल.
३. मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी काढलेल्या आदेशा प्रमाणेच जिल्हा न्यायालयातील कार्यालयीन कर्मचारी यांना परवानगी असेल.
४. जिल्हा कोषागार कार्यालय यांनी त्यांचे अंतर्गत व महत्वाच्या कार्यालयीन कामकाजासाठी त्यांचे कार्यालयाचे ओळखपत्र वापरुन कामकाज करणेस परवानगी देण्यात येत आहे.
५.अंत्यविधीसाठी शासनाचे पत्रकात नमुद केलेनुसार नियमानुसार परवानगी असेल.
६. पोस्ट ऑफीस राजुरी वेस आणि अधिक्षक पोस्ट ऑफिस बीड येथील कर्मचारी यांना ओळखपत्र वापरुन कामकाज करणेस परवानगी असेल.
७. सर्व प्रकारची मालवाहतूक त्याअनुषंगाने बीड शहराच्या हधीतील गोदामे चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
बीड शहरात कोवीड-१९ चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षता घेता संपूर्ण शहरामध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणेत आले आहे. तसेच जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार दिनांक ३० जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वा पर्यंत प्रतिबंधात्मक लागू करण्यात आले आहे, सदर आदेश या आदेशासह लागू राहतील.