प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका विभागात मोठ्या पदावर कार्यरत असलेला अधिकारी कोरोना बाधित, त्यांचे चार सहकारी कर्मचारी यांना क्वारांटाईन करण्यात आले आहे.

श्रीरामपूर येथील एका उच्च अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यानंतर एकच खळबळ उडाली.सदर अधिकारी यांची देवळाली प्रवरातील संबधित अधिकाऱ्याशी बैठक झाली. या बैठकीला विद्यमान आमदार व एक मंञी ही उपस्थित होते. या बैठकीत त्यांचा संपर्क आल्याने देवळाली प्रवरातील अधिकारी यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
सदर अधिकारी जरी वास्तव्यास शिर्डी येथे असले तरी कार्यक्षेत्र देवळाली प्रवरा असल्याने सहकारी अधिकारी व कर्मचारी यांचा संपर्क आल्यामुळे त्यांच्या चार सहकारी कर्मचाऱ्यांना कृषी विद्यापीठ येथे क्वारंटाईन करण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.