प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी पुन्हा एक कोरोना रुग्ण आढळला असल्याने पुन्हा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी एक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे संपूर्ण कोळगाव प्रशासनाकडून शील करण्यात आले असून त्याच्या अजून किती जण संपर्कात आले आहेत याचा आरोग्य विभाग कसून शोध घेत आहेत. जे त्या व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत, अशा 10 लोकांना प्रशासनाकडून क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचे अहवाल लवकरच आरोग्य विभाग श्रीगोंदा यांच्याकडे उपलब्ध होतील, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर यांनी दिली आहे,
तसेच नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही मात्र दक्षता घेणे गरजेचे आहे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर यांनी केले आहे.
propecia hair – http://finasteridepls.com/ minoxidil without propecia
tadalafil liquid – tadalafil cheap tadalafil tadalafil 5mg