प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील १३, नगर शहर ०८, कोपरगाव तालुका ०२,अकोले ०२ आणि बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज दुपारी हे अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले.
यामध्ये नगर शहरातील गवळी वाडा, पाइप लाइन, हडको, ढवण वस्ती, चितळे रोड येथील ८ रुग्णांसह कोपरगाव तालुक्यातील कारंजा चौक, येसगाव आणि धारणगाव दवंडे मामा वस्ती येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले. अकोले शहरात ०२, संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०८, संगमनेर खुर्द येथे ०१, घुलेवाडी येथे ०१, संगमनेर शहरातील रहेमत नगर, विठ्ठलनगर,श्रमिकनगर येथेही प्रत्येकी एक रुग्ण आढळला. याशिवाय, बीड जिल्ह्यातील कारखेल (ता. आष्टी) येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)*