Beed : नैराश्यग्रस्तांना ओळखण्यासाठी पोलिसांचा प्रोजेक्ट सहाय्यता

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड – बीड पोलिसांचा ‘प्रोजेक्ट सहायता’ या उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयात नैराश्यग्रस्तांना ओळखण्याचे प्रशिक्षण दि. 2 व 3 जुलैला देण्यात आले.

या अंतर्गत नैराश्यग्रस्त लोकांना कसे ओळखावे, कसे हाताळावे याबातचे प्रशिक्षण सर्व ठाणे प्रमुख आणि इतर अधिकारी यांना देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉ. मोहम्मद मुजाहिद आले होते.

त्यांनी सध्याच्या काळात मानसिक आजारी रुग्ण वाढत असून त्यांना कसे ओळखावे, त्यांचे लक्षणे काय असतात, त्यांना कसे हाताळावे,काय उपचार पद्धती आहे,या बाबत माहिती देऊन प्रशिक्षण दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here