Ahmednagar : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सुद्रिक; शिरसाठ उपाध्यक्ष

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नगरः अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ संचालक शरद सुद्रिक यांची, तर उपाध्यक्षपदी पाथर्डीच्या अर्जुन शिरसाठ यांची निवड करण्यात आली.

जिल्हा निबंधक कार्यालयातील सभागृहामध्ये सामाजिक अंतर पथ्थ्याची काळजी घेतही निवडणूक झाली. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी होते. यावेळी शिक्षक बँकेचे सर्व संचालक हजर होते.

सुद्रिक यांच्या नावाची सूचना नानासाहेब बडाख यांनी केली, तर शिरसाठ यांच्या नावाची सूचना बाळासाहेब मुखेकर यांनी केली. गुरूमाउली मंडळाच्या धोरणानुसार शिक्षक बँकेचे अध्यक्ष संतोष दुसुंगे व उपाध्यक्ष नानासाहेब बडाख यांनी राजीनामा दिल्यामुळे या रिक्त पदावर आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.

गुऊमाउली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, दत्ता कुलट, बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे, राजकुमार साळवे, मच्छींद्र लोखंडे, साहेबराव अनाप, विद्या आढाव, रामेश्वर चोपडे, बाळासाहेब तापकीर, राजकुमार साळवे ,राम निकम, अविनाश निंभोरे, सुरेश निवडुंगे, नारायण पिसे,  आर. टी. साबळे, भाऊराव राहिंज आदी उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिका-यांचा प्राथमिक शिक्षक संघ व गुऊमाउली मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here