Shevgaon : शासनाकडून गटई कामगारांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – देशात covid-19 आजारामुळे लॉकडाऊन केल्याने हातावर पोट असणाऱ्या चर्मकार समाजातील गटई कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे. शासनाने गटई कामगारांना आर्थिक मदत करून त्यांची होणारी उपासमार थांबवावी, असे आवाहन चर्मकार ब्रिगेड संघाचे शेवगाव तालुका अध्यक्ष महेश शेवाळे यांनी केली आहे.

चर्मकार समाजातील बहुतांश कुटुंब हातावर पोट भरणारे आहेत. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन पुढेही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गटई कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याकडे लोकप्रतिनिधी व शासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
शासनाने गटई कामगार व चप्पल व्यावसायिक यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून रेशन कार्ड नसल्याने कुटुंबांना गहू, तांदूळ व इतर साहित्य देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी चर्मकार ब्रिगेड संघाचे शेवगाव तालुका अध्यक्ष महेश शेवाळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here