Corona : इंदिरानगर पाठोपाठ अशोकनगर फाट्यावर आढळला कोरोनाबधित रुग्ण…

0

श्रीरामपूर: एका बधिताचा मृत्यू; मृतदेहाचा नगर ते श्रीरामपूर प्रवास,

लोकप्रतिनिधी महोदयांच्या संपर्कातील राजकीय नेते क्वारंटाईन

नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज; नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी

वडाळा महादेव : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव हद्दीतील अशोकनगर फाटा परिसरातील फोटोग्राफर तरुण करोना आजाराने बाधित झाला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हा तरुण काही दिवसापूर्वी आपल्या बहिणीला पोहोच करण्यासाठी गेला होता. तसेच येताना चाळीसगाव, कन्नड, औरंगाबाद मार्गे वडाळा महादेव येथे परत आला. त्यानंतर एका लग्नाची ऑर्डर पूर्ण केली.या कालावधीत त्रास होत असल्याने सदर तरुणास वैद्यकीय उपचार सुरू केले. तरी संशय येत असल्याने त्यास तपासणी करण्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितला. त्यानुसार अहमदनगर येथे विविध तपासणी करून त्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला.

प्रशासनाकडून परिसरात खबरदारीच्या उपाययोजना सुरू असून तरुणाच्या संपर्कातील व्यक्तींना शोध मोहीम सुरू आहे. संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकिय प्रशासनाने दिली आहे. तरी परिसरातील नागरिकांनी स्वतःहून माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.

इंदिरानगर येथील एक तरुण बाधित असल्याचे काल पुण्यात समोर आले. याची माहितीही आरोग्य प्रशासनाला मिळाली. मात्र जिल्हा प्रशासनाच्या यादीत ते नाव नसल्याने या परिसरात व शिरसगाव हद्दीत कुठल्याही उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत. या तरुणांच्या संपर्कातील दोन तरुण स्वतःच्या तपासणीसाठी पुढे आले. गावातील कोरोना समिती मात्र काही घडलेच नाही, अशा पद्धतीने परिस्थिकडे दुर्लक्ष करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here