
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
boAt Bassheads 100 in Ear Wired Earphones with Mic(Taffy Pink)
₹ 349.00 (as of January 26, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)WeCool Moonwalk M1 in Ear Headphones with Mic, 12 Hrs Playtime with Case, Ergonomic Sweatproof Wireless Earphones with Voice Assistant (Black)
₹ 799.00 (as of January 26, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)श्रीगोंदा – मागील वर्षी ऊस उपलब्धते अभावी ‘नागवडे’ कारखान्याचा गाळप हंगाम बंद होता. आगामी हंगामासाठी ‘नागवडे’च्या कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध आहे. कारखान्याची यंत्रसामग्री देखभाल, दुरुस्तीची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. ‘नागवडे’ कारखान्याने या हंगामासाठी ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे, मत ‘नागवडे’चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.
कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते रोलरचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना नागवडे म्हणाले की, राज्य साखर संघाचे अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव नागवडे यांचे विचार आणि संस्कार घेऊन ‘नागवडे’ कारखाना यशस्वीपणे पुढे वाटचाल करीत आहे. नागवडे कारखान्याने सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन सर्वांचे बरोबरीने बाजारभाव दिला आहे. कधीही शेतकऱ्यांची देणी थकली नाहीत, एफआरपीप्रमाणे ऊसदर देत व प्रसंगी ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा अधिक दर दिलेला आहे. दिवंगत बापूंचा वारसा चालविण्याचे काम व्यवस्थापन यशस्वीपणे करीत आहे. स्व.बापूंचे स्वप्न असलेल्या 26 मेगावॅट क्षमतेच्या सहवीज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पाची चाचणी यशस्वी झालेली आहे. या हंगामापासून सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
सहवीज निर्मिती प्रकल्पामुळे कारखान्याचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे सभासद, शेतक-यांना अधिक ऊसदर देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे गेले काही दिवस बंद असलेल्या आसवनी प्रकल्पाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून हा प्रकल्पही या हंगामात पूर्ववत कार्यान्वीत होईल, असा विश्वास व्यक्त करुन नागवडे म्हणाले की, ‘नागवडे’ कारखान्याने स्व.बापूंच्या नेतृत्वाखाली सभासद, शेतक-यांचा विश्वास संपादन केलेला आहे. स्व.बापूंचा वारसा यापुढेही समर्थपणे चालविला जाईल.काटकसरीने कारभार करुन सभासद व ऊस उत्पादक हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन ऊस उत्पादकांना अधिकाधिक दर देण्यासाठी संचालक मंडळ कटीबद्ध आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक विश्वनाथ गिरमकर, श्रीनिवास घाडगे, पंचायत समितीचे माजी सभापती अरुणराव पाचपुते, योगेश भोईटे, विलासराव काकडे, प्रा. सुनील माने, युवराज चितळकर, शरद जगताप, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, कारखान्याचे मुख्य अभियंता रामचंद्र मखरे,सहवीज निर्मिती प्रकल्पाचे व्यवस्थापक संजय दिघे, स्थापत्य अभियंता संपत कुलांगे आदिसह अधिकारी, कामगार व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी प्रास्ताविक केले तर रामचंद्र मखरे यांनी आभार मानले.