प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
वाढदिवसाच्या बहाण्याने घरी नेऊन कोल्ड्रींकमध्ये गुंगीचे औषध पाजून एका 44 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील मानखूर्द परिसरात घडली. वैद्यकीय अहवाल तपासणीनंतर 8 दिवसांनी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांना अटक केली.

मुदस्सीर नबी शेख (30), अब्दुल शेख (34), मुराद शेख (29), हैदल शेख (35), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी लेबर कॅम्प धारावी येथे राहतात.
आरोपी अब्दूल शेख याने 24 जून रोजी मित्र मुराद शेख याच्या मुलाचा वाढदिवस आहे, असे सांगून मित्राच्या घरी नेले. तेथे तिच्या नकळत कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध दिले. काही वेळाने बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर चौघांनी आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर तिला टॅक्सीतून घरी सोडले.
घटनेनंतर दुस-या दिवशी महिलेला त्रास होऊ लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी महिलेच्या अंगावर ठिकठिकाणी ओरखडल्याचा आणि इतर जखमा, चिमटे काढले असल्याचे दिसून आल्यानंतर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. महिलेने आरोपींविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघांना अटक केली.