Kopargaon : अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आरोपी जेरबंद

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला कोपरगाव पोलिसांनी पाटोदा जवळ अटक केली. त्याच्याकडून तब्बल 5 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेस चार किमी अंतरावर असलेल्या नगर-मनमाड राज्यमार्गावर साईधाम कमानीजवळ पाटोदा ता.येवला येथील रात्री नऊ वाजेच्या सुमारास आरोपी नामदेव रामदास बोरणारे (वय-४३) हा आपल्या मारुती एस.एक्स.४ (क्रं.एम.एच.४३ ए. जे.२७०९) या गाडीत बसून आपल्याजवळ अवैध गावठी पिस्तूल बाळगून असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षण राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत या आरोपी जवळील विक्रीसाठी असलेले एक पिस्तूल, एक मॅगझीन, जिवंत काडतुस, एक एम.आय.कंपनीचा भ्रमणध्वनी, असा ५ लाख ३६ हजार २०० रुपयांचा ऐवजासह आरोपी जेरबंद केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी या आरोपी विरुद्ध गु.र.नं.२४५/२०२०,आर्म ऍक्ट ३/२५,७ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करित आहेत.त्यामुळे या भागात अवैध शस्र विकणारी टोळी कार्यरत आहे काय असा सवाल निर्माण झाला आहे.या पूर्वी कोपरगाव बस स्थानकावर अनेक गावठी पिस्तूल असणारी एक बॅग मिळाली होती.मात्र त्या आरोपींचा शोध लागला नव्हता.बहुधा आरोपीने पोलिसांना पाहून त्यांनी धूम ठोकली असल्याची शक्यता आहे.यात आरोपीने कशासाठी शस्र बाळगले हे माहिती होणे आवश्यक आहे.कारण सहा महिन्यांपूर्वी भोजडे चौकी येथे एका गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून एका इसमाचा खून केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here