आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार कडून वृक्षारोपण
ढोरजळगांव – प्रहार संघटना राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देते सर्वसामन्याच्या सुख दु:खात प्रहार नेहमी आशेचा किरण आसल्याचे प्रतिपादन प्रहारचे शेवगांव तालुका अध्यक्ष संदीप बामदळे पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू दि ५ रोजी यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव तालुक्यामध्ये प्रत्येक शाखेचे ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी बामदळे बोलत होते.
बामदळे पुढे म्हणाले की शेवगाव तालुक्यात प्रहारतर्फे शंभर झाडे लावण्यात आली. नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार कुठलेही पोस्टरबाजी न करता प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येकी एक तरी झाड लावावे. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करावी. दिव्यांग व्यक्तींना मदत करावी व माझा वाढदिवस साजरा करावा, असे स्पष्ट आदेश दिले होते.
यावेळी इरफान काझी यांच्या शेतातून जाणाऱ्या शिवरस्त्याला वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कल्पेश दळे, लक्ष्मी ताई देशमुख, सतीश पवार, दिगंबर पवार, देविदास गरड, संजय पवार, लक्ष्मण आगळे, कृष्णा ढवळे, बाबासाहेब धुमाळ, दिगंबर आहेर, आदी उपस्थित होते.
tadalafil generique – tadstrong.com tadalafil pill
Na