Pune : घरात पडलेले जुने स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्यूटर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दान करा

0

पुणे जिल्हा परिषदेचा उपक्रम, सुप्रिया सुळे यांचाही प्रतिसाद

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

घरात पडलेले जुने स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्यूटर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दान करा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेने केले आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्यूटर आदी उपकरणांअभावी त्यांच्यापर्यंत हे शिक्षण पोहोचणे दुरापास्त झाले आहे.

15 जुलैपासून पुण्यातील झेडपीच्या शाळांत ऑनलाईन शिक्षण सुरु होणार आहे. झेडपीच्या शाळेत दोन लाख 32 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र एक लाख 32 हजार कुटुंबियांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध आहेत. तर एक लाख विद्यार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात आला आहे. झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली.

या उपक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांनीही या उपक्रमाला ट्विट करून प्रतिसाद दिला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत.परंतु ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.परंतु ग्रामिण भागातील अनेक विद्यार्थ्यांना अँड्राईड फोन,स्मार्ट टिव्ही,टॅब, लॅपटॉप, कंम्प्युटर अशा साधनांच्या अभावी शिक्षण घेणे अवघड झाले आहे. हे लक्षात घेऊन @PuneZp ने समाजातील दानशूर व्यक्तींना आपले सुस्थितीतील जुने मोबाईल, टॅब, लॅपटॉप, कंम्प्युटर, स्मार्ट टिव्ही अशा वस्तू या विद्यार्थ्यांना दान करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय शक्य असल्यास या सर्व वस्तू नव्याही घेऊन देता येतील, असे ट्विट सुळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here