प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
जालना – देशी दारूची चोरटी विक्री करण्यासाठी वाहतूक करताना चंदनझिरा येथे सापळा लावून शिताफीने पकडले. आरोपी मोटारसायकलवर पाठीमागून दोन्ही बाजूला दोन व समोरील बाजूला एक बॉक्स घेऊन जात असताना तीन बॉक्स जप्त करण्यात आले.
आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाणे चंदनझिरा येथे पोलीस कर्मचारी अनिल काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव राहुल रामू गायकवाड (रा.चंदनझिरा जालना) असे आहे. पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी अनिल काळे यांनी ही कामगिरी बजावली.